Pune News : बायकोशी भांडला, घरातून निघाला, लोकेशन पाठवलं अन्…!! पुण्यातील घटनेने सगळेच हादरले


Pune News : बायकोसोबत भांडण झाल्यानंतर नवऱ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोशी भांडण झाल्यानंतर नवरा घरातून बाहेर निघाला, यानंतर त्याने स्वत:चं लाईव्ह लोकेशन पत्नीला पाठवलं आणि आपण जीवन संपवत असल्याचा मेसेज त्याने केला.

पत्नीला मेसेज केल्यानंतर पतीने नदीमध्ये उडी मारली, या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

श्रीकांत देशमुख मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

देशमुख आणि त्यांची पत्नी पुण्याच्या धनकवडी भागात राहत होते. बायकोसोबत भांडण झाल्यानंतर देशमुख घरातून बाहेर पडले आणि ते कार घेऊन निघाले. ७५ किमी ड्राईव्ह केल्यानंतर श्रीकांत देशमुख वरंधा घाटात पोहोचले. मुसळधार पाऊस पडत असतानाच त्यांनी वरंधा घाटात गाडी थांबवली आणि मोबाईलवरून पत्नीला लाईव्ह लोकेशन पाठवलं.

आपण आयुष्य संपवत असल्याचा मेसेजही त्यांनी पत्नीला केला, यानंतर श्रीकांत देशमुख यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती भोर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्सपेक्टर अण्णा पवार यांनी आयएएनएसशी बोलताना दिली आहे.

नवऱ्याचा असा मेसेज पाहून पत्नी घाबरली आणि तिने लगेच जवळच असलेले पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही लगेच सूत्र फिरवत श्रीकांत देशमुख यांचे शेवटचं लाईव्ह लोकेशन भोर पोलिसांना पाठवले. Pune News

भोर पोलिसांनीही लगेच देशमुख यांना शोधण्यासाठी रेस्क्यू टीम तयार केली. पोलिसांची टीम श्रीकांत देशमुख यांनी दिलेल्या लोकेशनवर जाऊन पोहोचली. श्रीकांत देशमुख यांनी पाठवलेले लोकेशन भोर पोलीस स्टेशनपासून ४५ किमी अंतरावर होते.

लोकेशनवर पोहोचल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला पण त्यांना श्रीकांत देशमुख सापडले नाहीत. ५ किमी पुढे गेल्यानंतर पोलिसांना श्रीकांत देशमुख यांची कार सापडली. दोन तास पोलिसांनी सर्च ऑपरेशन केल्यानंतर पोलिसांना नदीमध्ये श्रीकांत देशमुख यांचा मृतदेह सापडला.

वरंधा घाटात असलेल्या ब्रीजवरून श्रीकांत देशमुख यांनी नदीमध्ये उडी मारली होती. श्रीकांत देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं, त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाला देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!