Pune News : शेतकऱ्यांनो आता खते, बियाणे व कीटकनाशके याची तक्रार व्हॉटअँपवर करता येणार, जाणून घ्या…
Pune News : सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. अजून पुरेसा पाऊस पडला नसला तरी पूर्वतयारी साठी शेतकरी बियाणे खते खरेदी करत आहेत. याबाबत आता राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे.
खते, बियाणे व किटकनाशके आदी निविष्ठांच्या खरेदीप्रसंगी दुकानदारांकडून जादा दराने विक्री, खरेदी पावती न देणे, एका निविष्ठेसोबत दुसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे, असे प्रकार घडतात.
तसेच निविष्ठा उपलब्ध असतानाही विक्री न करणे, मुदतबाह्य – निविष्ठा विक्री करणे आदी स्वरुपाच्या तक्रारी कळविण्यासाठी जिल्हास्तरावर 9158479306 हा व्हॉटसॲप क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या अडचणी आल्यास त्यांनी दिलेल्या व्हॉटसॲप क्रमांकावर आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी. असे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर शहानिशा करुन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. Pune News
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी माहिती दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.