Pune News : रांजणगाव एमआयडीसीत बनावट पाचशे रुपयांच्या नोटा हस्तगत, कागद,प्रिंटर आदी साहित्य जप्त ….!!


Pune News : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी बनावट चलनांच्या छापखान्यावर छापा टाकून एकाला अटक केली आहे.

मनीष अमरपाल असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३० हजार रुपये किमतीच्या बनावट जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, शिरुर शहराजवळील रामलिंग रोडवर एका सदनिकेमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा मारला आहे. त्या ठिकाणावरून नोटा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यावेळी आरोपी वास्तव्यास असणाऱ्या फ्लॅटमध्ये बनावट चलन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कागद, कलर, प्रिंटर पोलिसांनी जप्त केले आहे. बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यत असल्याचा अंदाज रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!