Pune News : पाचवीची मुलगी एकटीच पुण्याहून ठाण्याला पोहोचली, पण का? कारण ऐकून सगळ्यांना धक्काच बसला…

Pune News : पाचवीची मुलगी एकटीच पुण्याहून ठाण्याला पोहोचली मुलगी घरी न परतल्याने पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कॅबचालकाशी संपर्क साधला तेव्हा ते ठाण्यात पोहोचले होते. मुलीला जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यास सांगण्यात आले.

कॅबचालकाने मुलीला कासारवडवली पोलिसांकडे सुपूर्द केले. अभ्यास आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलीला घरी जायचे नव्हते. पोलिसांनी समजूत काढल्याने ती अखेर राजी झाली.
मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी शाळेतून रिक्षाने काही अंतर पुढे गेली. ‘आई-वडील ठाण्याला आत्याच्या घरी गेले असून, मलाही तिकडे जायचे आहे. त्यासाठी कॅब मिळवून द्या,’ अशी विनंती मुलीने केली. तिचे बोलणे खरे वाटून रिक्षाचालकाने कॅब बोलावली. शाळा सुटून बराचवेळ झाला, तरी मुलगी घरी आली नाही म्हणून काळजीत सापडलेल्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. Pune News

पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ तपासून रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाने कॅबची माहिती दिली. कॅबच्या मालकाशी संपर्क साधून चालकाचा मोबाइल क्रमांक मिळवला. पोलिसांनी कॅबचालकाशी संपर्क साधून त्याला सर्व हकिकत सांगितली; तसेच मुलीला जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले.
कॅबचालक मुलीला घेऊन कासारवडवली पोलिस ठाण्यात गेला. पुणे पोलिसांचे पथक आणि मुलीचे वडील व काका यांनी ठाणे गाठले. मुलगी सुखरूप असल्याचे पाहून त्यांच्या जिवात जीव आला.
अभ्यासाचे ओझे तसेच शाळा, शिकवणी आणि वेगवेगळ्या क्लासचे बरडन आणि पालकांच्या अपेक्षा या साऱ्या तणावातून मुलीने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.