Pune News : काळजी घ्या.. पुण्यात डेंग्यूचा हाहाकार, सप्टेंबर महिन्यात वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांचा उच्चांक
Pune News पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ताप, सर्दी, खोकल्यासह डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. Pune News
पुण्यात चार वर्षातील सर्वाधिक उच्चांकाने सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कऱण्यात आले आहे.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे ७० रुग्ण आणि ६८३ संशयित रुग्ण आढळून आले. या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची संख्या सप्टेंबरमध्ये होती.
अशी घ्या काळजी…
वैयक्तिक स्वच्छतेचा सराव करा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
घरामध्ये आणि आजूबाजूला न वापरलेल्या किंवा अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याची खात्री करा.
वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी आणि कीटकनाशक उपचार केलेल्या बेड नेटचा वापर केला जाऊ शकतो.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घरातील पाण्याचे भांडे आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करा.
घरांमधील पाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करा.
घराभोवती साचलेले पाणी सोडणं टाळा.
वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधक जाळी वापरा.
या सगळ्या रोगांचा सामना करण्यासाठी डासांची प्रजनन होईल त्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी ठिकाणं तत्काळ नष्ट करण्यासह प्रतिबंधात्मक योजना तयार करण्यात आली आहेशिवाय डेंग्यू चाचणी किट महानगरपालिकेचे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत. नागरिकांनी नियमित तपासणी आणि तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.