Pune News : पुण्यात दहीहंडीत मोठा गोंधळ, आप्पा बळवंत चौकात ढोल ताशा पथक अन् मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी…

Pune News : पुणे : पुण्यात (Pune News) गुरूवारी (ता.७) दहीहंडीचा (Dahi Handi 2023) सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दरम्यान, या उत्सवाला काही ठिकाणी गालबोटही लागल्याचे पाहायला मिळाले आहे.
काल शहरामध्ये आज मोठ्या उत्साहात दहीहंडीचे (Dahi Handi 2023) आयोजन करण्यात आले होते. दहा वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पुण्यात (Pune News) डीजेच्या तालावर नागरिक नाचत होते. मात्र, दहीहंडी (Dahi Handi 2023) फुटल्यानंतर आपापल्या दिशेने मार्गस्थ होत असताना धक्काबुक्की झाल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली आहे.
पुण्यातल्या (Pune News) प्रसिद्ध असलेल्या आप्पा बळवंत चौकात हा सगळा प्रकार घडला आहे. तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे दोन गटांमध्ये झटापट आणि हाणामारी सुरू होती. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाला हाणामारी पासून रोखले आणि जमलेल्या जमावाला पांगवून दिले आहे.
तसेच किरकोळ कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. क्षणात या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी गोविंदा पथकातील सदस्यांनी ढोल पथकाच्या वादकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे चौकात काही काळ तणावाचं वातारवण निर्माण झाले होते.
दरम्यान, पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांना आवर घालणे कठीण जात होते. त्यावेळी मंडळाचे कार्यकर्त्यांनी वादकांवर बरसत होते. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी खूप जमली होती आणि मोठा गोंधळ आप्पा बळवंत चौक परिसरात घडला होता.