Pune News : पुण्यात आज रंगणार दहीहंडीचा उत्सव, दहीहंडीमुळे वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग…


Pune News  पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच दडीहंडी (Dahi Handi) उत्सवाची पुण्यात (Pune News)  तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात लाखोंच्या संख्येनं पुणेकर (Pune News) एकत्र येत असतात.

त्यामुळे शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक सायंकाळी पाच ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार आहे.

मध्य वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी (Dahi Handi) उत्सव साजरा केला होता. बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते बाबू गेनू चौक, साहित्य परिषद चौक येथे मोठी गर्दी असते.

या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये; म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

अशा प्रकारे असेल वाहतूक बदल..

शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने, शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे.

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक चौक, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता येथून इच्छित स्थळी जावे.

स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने- झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असणार आहे. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.

रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.

सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जावे.

शिवाजी रस्त्यावरून जिजामाता चौकातून गणेश रस्त्याने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलिस चौकी अशी राहील.

गणेश रस्त्यावरील वाहतूक दारुवाला पूल येथून बंद राहील. देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दूधभट्टी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!