Pune News : किस पाहिजे का म्हणत केली विचारपूस, शिक्षकाकडूनच महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, वानवडी येथील संतापजनक प्रकार…


Pune News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

एका शिक्षकानेच महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजच्या स्टाफ रुमध्ये बोलावून घेत ‘किस पाहिजे का’ असे म्हणत विनयभंग केला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

याप्रकणी य पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (ता.३०) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश किसन चव्हाण (वय.३२ रा. भेकराई नगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी वानवडी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्याच महाविद्यालयात आरोपी रमेश चव्हाण हा शिक्षक आहे. आरोपीने पीडित तरुणीच्या मोबाईलवर वारंवार आय लाईक यु, आय लव यू असे मेसेज पाठवून तिला त्रास दिला. तिला व्हिडिओ कॉल करुन तिच्यासोबत अश्लील बोलून मानसिक त्रास दिला. Pune News

तसेच आरोपीने पीडित तरुणीला कॉलेजमधील शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेतले. पीडित तरुणी स्टाफ रुममध्ये आली असता ‘किस पाहिजे का’ अशी विचारणा करुन तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!