Pune News : अंगणात खेळत असणाऱ्या बालकांना घरात नेलं, पॉर्न व्हिडीओ दाखवले अन्…: पुण्यात भयंकर घटना

Pune News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाच वर्षाच्या मुलासोबत आणि मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सांगवी सांडस येथे ही घटना घडली आहे. २५ नोव्हेंबरला सायंकाळी चार ते पाच या दरम्यान सांगवी सांडस येथील आरोपीच्या घरात घडली. Pune News
याप्रकणी दोन्ही चिमुकल्यांच्या आईने पोलिसांत धाव घेतली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या याच्यावर पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दोन्ही चिमुरडे त्यांच्या घराच्या अंगणात खेळत होते. खेळत असताना आरोपी त्यांच्या अंगणात आला आणि त्या दोघांना घरात घेऊन गेला. त्यावेळी दोन्ही पाच वर्षांच्या मुलांना घेऊन घरात गेला आणि मुलांना मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडीओ दखवले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पिडीत मुलांच्या आईला समजल्यानंतर त्यांनी रविवारी (ता.२६) लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.