Pune News : आता पुण्यातील गुंडगिरीला आणि भाईगिरीला बसणार आळा! पोलीस आयुक्तांच्या निर्णयामुळे गुंडांच्या अंगावर आला काटा…
Pune News : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. आता या प्रकरणी पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे ‘मॅपिंग’ करा, असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पुणे शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशी भूमिका आता पुणे पोलिसांनी घेतली आहे.
या घटनांशी संबंधित आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी कोयता गँगच्या गुंडांनी येरवडा परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली होती. आरोपींच्या हातात कोयता तसंच हॉकी स्टिक असल्यानं नागरिक चांगलेच धास्तावले होते.
१९ फेब्रुवारी रोजी पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांनी येरवडा परिसरात वाहनांची तोडफोड केली होती. हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या इराद्याने आलेल्या ५ जणांच्या टोळक्याने येरवडा परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली होती.
दरम्यान, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी शहरात मोठे ड्रग्ज रॅकेट असल्याचे समोर आले आहे. तेव्हापासून मोठी खळबळ उडाली आहे. Pune News
शहरातील ड्रग्ज तस्करांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. लंडनमध्ये दिल्लीतून १४० किलो मफेड्रोन ड्रग्जची तस्करी करण्यात आली, अशी कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली होती. यामुळे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे आता दिसत आहे.