Pune News : पुणे शहरात भाजपची जोरदार रणनीती! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस, अन् 18 चिटणीस..


Pune News पुणे : शहर भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून कार्यकारिणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. Pune News

जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारिणीमध्ये १८ जणांवर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर राघवेंद्र मानकर यांच्यावर यांच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जम्बो कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस पदी ८ जणांची तर १८ जणांची चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

उपाध्यक्ष..

विश्वास ननावरे, प्रशांत हरसुले, मंजुषा नागपुरे, जीवन जाधव, सुनिल पांडे, श्याम देशपांडे, प्रमोद कोंढरे, अरुण राजवाडे, तुषार पाटील, स्वरदा बापट, योगेश बाचल, भूषण तुपे, संतोष खांडवे, महेंद्र गलांडे, रूपाली धावडे, हरिदास चरवड, गणेश कळमकर, प्रतीक देसर्डा यांची निवड करण्यात आली आहे. वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, रवी साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सरचिटणीस..

वर्षा तापकीर ( भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी), राजेंद्र शिळीमकर, रवी साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे

चिटणीसपदी.. 

कुलदीप साळवेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांडवे, प्रवीण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुश्यंत मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ, महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षदा फरांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नामदेव माळवदे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमराव साठे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इम्तियाज मोमीन आणि व्यापारी आघाडी अध्यक्ष म्हणून उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही माजी नगरसेवकांना ही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!