Pune News : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यात PMPLचा मोठा निर्णय…


Pune News पुणे : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यात गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तत्काळ बससेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) (PMPL) मोठा निर्णय घेतला आहे. (Pune News)

गणेशोत्सवातील दहा दिवस ९२४ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीची बस सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांना पाच रुपये जादा द्यावे लागणार असल्याची माहिती आहे.

पुण्यातील भाविकांना तत्काळ बससेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने यंदा ‘पीएमपी’कडून २० ते २८ सप्टेंबरदरम्यान ६५४ जादा बस मार्गावर सोडण्यात येणार आहे, तर पिंपरी-चिंचवड येथून २७० बस सोडल्या जाणार आहेत. या काळात पीएमपीची सेवा २४ तास सुरू राहणार आहे.

पुण्यातून बस सुटणारे डेपो व मार्ग…

स्वारगेट बस स्थानक : कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभुळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केट यार्ड, पुणे स्टेशन, सांगवी, आळंदी, वडगाव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर,हडपसर, कोंढवा हॉस्पिटल.

म.न.पा. स्थानक : लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर. भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगांव, विश्रांतवाडी, पाषाण,सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगेगांव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव,आकुर्डी रेल्वे स्टेशन,कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, कोथरूड डेपो.

पुणे स्टेशन /मोलेदिना स्टेशन : विश्रांतवाडी, लोहगांव, वाघोली, विमाननगर, वडगांव शेरी, आळंदी.

हडपसर गाडीतळ : स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरळी कांचन, मांजरी,थेऊर, फुरसुंगी, देवाची ऊरूळी.

महात्मा गांधी बस स्थानक कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.

डेक्कन जिमखाना : कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखलेनगर, कोथरूड डेपो.

निगडी बस स्थानक: म.न.पा. भवन करीता.

भोसरी बस स्थानक : म.न.पा. भवन करीता.

चिंचवडगांव बस स्थानक : म.न.पा. भवन करीता.

पिंपरी चिंचवड येथून सुटणाऱ्या अतिरिक्त बस..

निगडी- ७० बस

चिंचवडगाव- ३५ बस

भोसरी- ६२ बस

पिंपळे गुरव – २० बस

सांगवी – १५ बस

आकुर्डी रेल्वे स्टेशन – १६बस

चिंचवडगाव मार्गे डांगे चौक – ३० बस

मुकाई चौक रावेत- १२ बस

चिखली/संभाजीनगर – १० बस सुटणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!