Pune News : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, अपघातात दोघांचा गेला होता जीव..


Pune News : पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्शे कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यवसायकाचा मुलगा चालवत होता.

या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वृत्तानुसार, आरोपीच्या वकिलाने सांगितले की, त्याच्या जामिनावर पुनर्वसन आणि जागरुकतेच्या अटी आहेत.

मंडळाने १७ वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्यास, मद्यपान सोडण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यास आणि मानसिक समुपदेशन घेण्यास सांगितले आहे. Pune News

त्याचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, पुणे पोलिसांनी अटक केलेल्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने काही अटींवर जामीन मंजूर केला आहे, ज्यामध्ये आरोपीला १५ दिवस येरवड्यातील वाहतूक पोलिसांकडे काम करावे लागेल. त्याचबरोबर आरोपीला त्याला दारू सोडण्यासाठी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील कल्याणीनगर येथे दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याणीनगर येथील एका भोजनालयात पार्टी करून मित्रांचा एक गट त्यांच्या मोटरसायकलवरून घरी परतत होता.

एफआयआरनुसार, जेव्हा ते कल्याणी नगर जंक्शनवर पोहोचले तेव्हा एका वेगवान लक्झरी कारने एका मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे मोटरसायकलवरील दोन प्रवासी पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांना धडकल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथच्या रेलिंगला धडकली, असे सांगण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!