Pune News : पुण्यात पुन्हा एकदा भाईगीरीसाठी वाद, मारामारीत एकाने कानाचा लचकाच तोडला, घटनेने उडाली खळबळ..


Pune News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि हा एका टोकाला जात एकाने कानाचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाईगिरिच्या वादातून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट परिसरात असलेल्या मार्केट यार्ड रोडवर ही घटना घडली आहे.

याप्रकणी हर्ष कैलास कांबळे (वय.२०) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सौरभ नितीन आदमाने, पवन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दोन्ही आरोपी आणि फिर्यादी मित्र असून ते गप्पा मारत थांबले असता, गप्पा मारत एकाने मी मोठा भाई असल्याचं सांगितलं यावरून दुसऱ्या मित्राला राग आला आणि त्याने तू खूप मोठा भाई झालास का? असा प्रश्न विचारला.

ह सगंळ प्रकरण सुरु असताना दुसऱ्यांने रागाच्या भरात हल्ला करत फिर्यादीच्या कानाचा लचकाच तोडला, घटनेनंतर डोक्याला दगडाने मारहाण केली आणि एवढेंच नव्हे तर आरोपीने दारूची फुटलेली बाटली येऊन पीडित तरुणाच्या मागे लागला. Pune News

पीडितेने कसाबास जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पीडित थेट पोलिस ठाण्यात गेला आणि आरोपी सौरभ नितीन आदमाने पवन काळे या दोघांच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, घटनेनंतर पीडित हर्ष याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!