Pune News : बहिणीला कामावरुन कमी केल्याचा राग, टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना…
Pune News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
बहिणाला कामावरुन कमी केल्याने व तिच्या शेवटच्या महिन्याचा पगार दिला नसल्याच्या कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना शनिवारी (ता.२) रात्री पावणे दहाच्या सुमारास कोंढवा परिसरातील एनआयबीएम समोरील ब्लीच कॅफे येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सलमान तशरीफ खान (वय. २५ रा. एआरव्ही बिल्डिंग, उंड्री पिसोळी रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साकीब बाणेदार, मजम्मील, मिसबाह बाणेदार (सर्व रा. कोंढवा) व अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचा भाऊ हसीब खान याच्याकडे साकीब बाणेदार याची बहिण सॉफ्टवेअर बनविण्याचे काम करत होती. तिला कामावरुन काढल्याने व तिचा शेवटच्या महिन्याचा पगार दिला नाही. या कारणावरून साकीब व इतर आरोपींनी ब्लीच कॅफे येथे आले.
फिर्यादी सलमान खान हे साकीब याच्या बहिणीचा पगार घेऊन त्याठिकाणी आले असता आरोपींनी सलमान याला लाथा बुक्क्यांनी तोंडावर मारून गंभीर जखमी केले. सलमान याने कोंढवा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.