Pune News : ललित पाटील ड्रग्स प्रकरणी अजित पवार घालणार लक्ष, ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर पवारांच्या भेटीला…


Pune News  पुणे : ससून रुग्णालयाचीत ड्रग्स रॅकेट प्रकरणी अनेकांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

असे असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घातले असून डॉ. संजीव ठाकूर हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. Pune News

त्या अहवालात कुठेही या ससूनच्या कैद्यांच्या वार्डसंदर्भात माहिती दिलेली नाही. त्यावरुन पत्रकारांनी देखील त्यांना धारेवर धरले. मात्र ठाकूर यांनी या सगळ्या प्रकरणावर थेट भाष्य करणं टाळलं. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर.देखील यावरून वैतागले होते.

दरम्यान, रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात मी माहिती देऊ शकतो मात्र तो कसा पळाला आणि कुठे गेला, यासंदर्भात मी कोणतंही भाष्य करु शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता अजित पवार याबाबत लक्ष घालणार आहेत.

यावरून आता काही अधिकारी, पोलीस आणि मंत्री यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये शिंदे गटाच्या एका आमदाराचे देखील नाव घेतले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!