Pune News : दुचाकीला धक्का लागल्याने चक्क कार पळवून नेली, पुण्यातील घटना, नेमकं घडलं काय?


Pune News पुणे : बाणेर रस्ता येथील संचार भवन परिसरात एका कारचा धक्का लागून दुचाकीवरील मुलगा आणि मुलगी रस्त्यावर पडले. त्यानंतर चालकाने कार थांबवत काही लागले आहे का? अशी विचारणा केली. या वेळी दुचाकीस्वारांनी सदर कारच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . Pune News

याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर (वय २१, रा. लोणी काळभोर) याने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एमएच १२ आर झेड ८०४३ या दुचाकीवरील मुलगा आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तुषार कोळेकर हे त्यांच्या कारमधून बाणेर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा धक्का दुचाकीस लागला, त्यामुळे गाडीवरील मुलगा व मुलगी खाली पडले. Pune News

तेव्हा कोळेकर यांनी कार थांबवली आणि त्यांना काही लागले आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी त्यांची कॉलर पकडून ठेवली. दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोळेकर यांच्या गाडीची चावी घेत चारचाकी पळवून नेली.

दरम्यान, या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!