Pune News : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने आयुष्य संपवलं, अंगावर वेगळ्याच खुणा, पोलिसांचा संशय वाढला…
Pune News : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने राहत्या हॉस्टेलवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील गुरुवार पेठेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
अभिलाषा मित्तल (वय.२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे.
या प्रकरणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने ही हत्या आहे का आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अभिलाषा मित्तल ही तरूणी मूळची वाशिमची असून गेल्याच महिन्यात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. Pune News
मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा ही खोलीमध्ये एकटीच होती. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. नंतर मैत्रिणीने दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला, पण आतून कुठलाच आवाज येत नव्हता. नंतर खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने आत्महत्या केल्याचं दिसलं.
ही घटना उघडकीस येताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी अभिलाषाच्या नातेवाईकांची आणि मैत्रिणींची चौकशी केली आहे. अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या काही खुणा सापडल्याने ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.