Pune News : धक्कादायक! भांडणाचे शुटिंग केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग, फुरसुंगी येथील घटना…

Pune News पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलींच्या खेळण्याच्या भांडणातून दोन महिलांमध्ये भांडण झाले. या भांडणाचे शुटिंग केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना फुरसुंगी येथे घडली आहे. याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकणी ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल तुकाराम कोंडे (वय. ४०) व त्यांच्या ३७ वर्षीय पत्नीवर आयपीसी गुन्हा दाखल केला आहे. Pune News

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. फिर्य़ादी यांच्या मुलीचे सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत खेळण्यावरुन वाद झाला. याच कारणावरुन फिर्य़ादी यांचे एका महिलेसोबत भांडण सुरु होते. आरोपीने या भांडणाचे शुटिंग त्याच्या मोबाईल मध्ये केले.
दरम्यान, भांडण शुट केल्याचा जाब विचारण्यासाठी फिर्य़ादी गेल्या असता आरोपी त्यांच्या अंगावर धाऊन गेला. फिर्यादी यांच्यासोबत अश्लील भाषेत बोलून गैरवर्तन करत विनयभंग केला. तर आरोपीच्या पत्नीने फिर्य़ादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.