Pune News : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर! १२०० फूट खोल दरीत…


Pune News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा १२०० फूट खोल दरीतील कुंडात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी (ता.१२) दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून रोहन विरेश लोणी (वय २१ वर्ष) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रोहन हा मूळचा सोलापूर मधील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी तो त्याच्या इतर चार मित्रांबरोबर फिरण्यासाठी प्लस व्हॅली इथे आला होता. Pune News

त्यावेळी रोहन तिथे असलेल्या कुंडामध्ये पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला. मात्र लगेचच तो पाण्यात बुडू लागला. इतर तीन मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण तो पाण्यात बुडाला.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी उपस्थित झाली.

मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटकांनी जीवावर बेतेल किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!