Pune News : मोठी बातमी! पुणे शहरात एकनाथ शिंदे गटाला धक्का, बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Pune News : पुणे : शहरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेनेचे उपशहर प्रमुख होते. गेल्या काही दिवसांपासून राजाभाऊ भिलारे नाराज असल्याची चर्चा होती. (Pune News)
यामुळे शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी केली जात होती. मात्र, बुधवारी तातडीने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुण्यात एकनाथ शिंदे गटाने विश्वासू मोहरा गमवला आहे. आपण कोणाच्या ही बंधनात काम करू शकत नाही, असे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशची जबाबदारी राजाभाऊ भिलारे यांच्यावर होती. ते या संस्थांचे प्रचार आणि प्रसारचे काम करत होते.
राजाभाऊ भिलारे हे शिंदे गटात सामील होणारे पुणे शहातील पहिले शिवसैनिक होते. परंतु आता ते शिवसेनेतून बाहेर पडले आहे. ते आता कोणत्या पक्षात जातात? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन गट झाले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटांमध्ये शिवसेना विखरली गेली. अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.