Pune News : लैगिंक अत्याचाराला कंटाळून शाळकरी मुलाने केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरलं…

Pune News : अत्याचार तसेच अश्लील कृत्याला कंटाळून १५ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तरुणाला अटक केली.
त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
संकेत राजेश मोहिले (वय.२६) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची ओळख होती. मोहिलेने मुलाला वर्षभरापूर्वी तळजाई टेकडी परिसरात नेले. तेथे त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. मोहिलेने मोबाईलवर छायाचित्रे काढली.
दरम्यान, त्यानंतर त्याने मुलाला धमकाविण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करत आहेत.