Pune News : लाखोंची फसवणूक, मनसेचा माजी नगरसेवक अडकला, पुण्याच्या राजकारणात खळबळ..
Pune News : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मुलीला अनिवासी भारतीय विद्यार्थी (एनआयए) कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लष्करातील निवृत्त जवानची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली गेली आहे.
फिर्यादीनुसार जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी, माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची आरोपी शिंदे, सूर्यवंशी आणि तुपेरे यांच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना तुमच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले. Pune News
आरोपींनी त्यांच्याकडून रोख, तसेच ऑनलाइन स्वरुपात गेल्या वर्षभरात २७ लाख २६ हजार रुपये घेतले. मात्र नंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, सध्या वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पुणे शहरात मोठ्या संख्येने परराज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पालकांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते.
दरम्यान, राहुल तुपेरे हे मनसेचे माजी नगसेवक आहेत. पानमळा भागातून ते निवडून आले होते. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.