Pune News : पुणे जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ चे ७३ टक्के वितरण, उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार लवकरच लाभ..


Pune News पुणे : शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती निमित्त चार शिधा जिन्नस असलेला आनंदाचा शिधा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वितरीत करण्यात येत असून पुणे जिल्ह्यात आज अखेर ७३ टक्के आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. (Pune News)

प्रती शिधापत्रिका १ संच ज्यामध्ये १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल असे एकूण ४ जिन्नस असलेला १ संच १०० रूपये या दराने रास्तभाव दूकानातून वितरीत करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील ४४ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ८९०, बारामती तालुक्यात ८३ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी ४९ हजार ३१९, भोर तालुक्यात २६ हजार ८०० लाभार्थ्यांपैकी २१ हजार ५७४, दौंड तालुक्यातील ५२ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३३ हजार ३४, हवेली तालुक्यातील २१ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी १८ हजार ९५६, इंदापूर तालुक्यातील ६७ हजार १४५ लाभार्थ्यांपैकी ४२ हजार ३५१ लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील ६३ हजार ७०० लाभार्थ्यांपैकी ५४ हजार ४१८, खेड तालुक्यातील ५७ हजार ३५० लाभार्थ्यांपैकी ५१ हजार ३२५, मावळ तालुक्यातील ३६ हजार ८५० लाभार्थ्यांपैकी २९ हजार २४९, मुळशी तालुक्यातील १७ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी १४ हजार ६३३, पुरंदर तालुक्यातील ३७ हजार २०० लाभार्थ्यांपैकी २८ हजार ३६७, शिरूर तालुक्यातील ४६ हजार १५० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ५२३, तर वेल्हे तालुक्यातील ७ हजार ५५० लाभार्थ्यांपैकी ६ हजार ८३० लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

उर्वरित लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेखी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!