Pune : मोठी बातमी! क्रेनमध्ये बिघाड, जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात वाचले, घडला मोठा अनर्थ…
Pune : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात केली आहे.
आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.
ही यात्रा आज शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे. Pune
शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला.
यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.