Pune : जिल्ह्यात ५० हजार दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली! जिल्ह्यात पावणे दोन लाख मतदार वाढले..!!


Pune पुणे : पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांची अंतिम यादी आज प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदार यादीत १ लाख ७५ हजार ५९९ मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ९७ हजार ३५० पेक्षा अधिक आहे. १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ७९ लाख ५१ हजार ४२० होती, तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ८० लाख ७३ हजार १८३ होती. यंदाच्या वर्षी १ लाख ७५ हजार मतदारांची अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या ८१ लाख २७ हजार १९ एवढी झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत पुरुष मतदारांच्या संख्येत ७८ हजार ४९, तृतीयपंथी मतदार २००, परदेशातील मतदार ५७, सैन्य दलातील मतदारांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. तर दिव्यांग मतदार संख्या ९ हजार २६७ आणि ८० वर्षावरील मतदार संख्येत ३४ हजार १४१ एवढी घट झाली आहे. Pune

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत १८-४९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार २९९ मतदार वाढले, तर ५० वर्षावरील मतदारांच्या संख्येत ८७ हजार ४६३ एवढी घट झाली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तृतीयपंथी मतदारांची संख्या ६९५ ने वाढली आहे.

लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, प्रक्षेपित लोकसंख्यनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करुन घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुध्दीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरील मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहिम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले आहे.

५० हजारावर दुबार मतदारांची नावे वगळली…

मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने समान छायाचित्रे असलेली व दुबार नावे असलेली ५० हजारावर नावे वगळण्यात आली आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी यांनी दैनदिन आढाव्यात त्रुटी व अडचणींचे निराकारण करुन आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून समान छायाचित्रे असलेली ४० हजार ३९० आणि १० हजार २०४ दुबार नावे वगळली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!