Pune : पालिकेने नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग उखडला, नागरीकांना मिळाला मोठा दिलासा…
Pune : नगर रस्त्यावर असलल्या बीआरटी मार्गामुळे सातत्याने अपघात होत होते. त्यामुळे हा मार्ग काढून टाकावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. हजारो कोटी रुपये खर्चुन गाजावाजा केला गेलेला, परंतु,अर्धवट अंमलबजावणी केली गेल्याने अडथळा ठरलेला नगर रोडवरील बीआरटी मार्ग अखेर महापालिकेने मध्यरात्री कारवाई करुन तो काढून टाकला आहे.
तसेच कात्रज – स्वारगेट – हडपसर हा देशातील पहिला बीआरटीमार्ग सुमारे १५ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला होता. त्यावर जवळपास १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, त्याची अंमलबजावणी अर्धवट करण्यात आल्याने तो नेहमीच वादाचा आणि अपघाताचा विषय ठरला होता. Pune
त्यात काही काळाने उड्डाणपुलामुळे काही मार्गावरील बीआरटी काढून टाकावी लागली. स्वारगेट ते हडपसर हा मार्गही काढून टाकण्याची वेळ आली. नगर रोडवरील बीआरटी मार्ग बांधताना त्यामधील दुभाजकाला मोठी जागा सोडली गेली.
त्याचा परिणाम बाजूचा रस्ता लहान झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत गेली. त्यात मेट्रोचे काम या बीआरटी मार्गाच्या मध्येच सुरु करण्यात आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. बीआरटी सुरु नसताना त्याचे अवशेष वाहतूकीला अडथळा निर्माण करत होते.
त्यामुळे हा बीआरटी मार्ग काढून टाकण्याची मागणी वारंवार होत होती. याबाबत अहवाल देण्यासाठी गोखले इन्स्टिट्युटची नियुक्ती केली होती. त्यांनी हा मार्ग काढून टाकण्याची शिफारस केली होती.
त्यानंतर नगर रोडवरील पर्णकुटी ते विमाननगरमधील फिनिक्स मॉलपर्यंतचा १.८ किलोमीटरच बीआरटी मार्ग मध्यरात्री महापालिकेने उखडून टाकला आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.