पुणे महानगरपालिका घेणार १००० कोटींचे कर्ज, एवढ्या कर्जाचे करणार काय..?


पुणे : पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असे असताना आता पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या या गावांच्या विकासाठी 9 हजार कोटी रुपयांची मागणी पुणे महापालिकेनं राज्य सरकारकडे केली होती.

असे असताना सरकारकडून पुणे मनपाला निधी मिळाला नाही. यामुळे आता एक हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यामुळे आता याचा उपयोग विकास कामांसाठी होणार आहे.

दरम्यान, महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये मैलापाणी शुद्ध प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिका एक हजार कोटींचे कर्ज घेणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका प्रशासनाने इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनशी करार केला आहे. यानुसार आयएफसी महापालिकेला कर्ज पुरवठ्याकरण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. आयएफसीकडून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल येणार आहे.

या अहवालाचा अभ्यास करून महानगरपालिका कर्ज घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. महापालिकेने आयएफसीशी कर्ज घेण्यासंदर्भात करार केला आहे. पण महानगरपालिका कोणताही खर्च करणार नाही.

दरम्यान, महानगरापालिकेत खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी, नांदेड, न्यू कोपरे, नऱ्हे, पिसोळी, शेवाळवाडी, काळेवाडी, वडाचीवाडी, बावधन बुद्रुक, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, सणसनगर, नांदोशी, सूस, म्हाळुंगे या गावांचा समावेश केला गेला होता. याठिकाणी आता कामे सुरू होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!