पुणे महापालिका अधिकाऱ्यांच्या मुलाचा घाणेरडा प्रताप; मुलींसमोर करायचा अश्लील कृत्य ; पोलिसांनी मुसक्या आवळल्या..


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना समोर येत आहेत. अशातच पुण्यातील महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा घाणेरडा प्रताप समोर आला आहे. कॉलेजसमोर कारमध्ये बसून तो मुलगा मुलींसमोर अश्लील कृत्य करायचा. या प्रकरणी आता पोलिसांनी अधिकाऱ्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रणव केदार वझे असं त्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा वारंवार शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयाच्या आवारामध्ये कारमध्ये बसून पॅन्ट गुडघ्यापर्यंत काढून समोर मोबाईल धरून मुलींकडे बघत अश्लील चाळे करायचा. याप्रकरणी भाजप महिला नगरसेविकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाला अटक केली. आरोपी वझे याचे वडील पुणे महापालिकेत कार्यरत आहेत.

महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाने हा प्रताप यापूर्वी देखील काहीवेळा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचे वडील पुणे महापालिकेतील पथ विभागात कार्यरत आहेत. भाजप नगरसेविकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रणवच्या मुसक्या आवळल्या.पालिका अधिकार्‍याच्या मुलाच्या कृत्याने कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेने महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुणाला अटक केल्यानंतर कॉलेज परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली जात आहे. कॉलेजसमोर संतापजनक प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!