पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात, अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या.

पुणे : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सध्या एक विचित्र अपघात झाला आहे. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यामध्ये जीवित हानी झाली नाही. यामध्ये एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे.

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झालाय. काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जात आहे. वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. अपघातात एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. या विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्पा झाली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.

या अपघातात ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढत आहेत. या अपघातानंतर गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Views:
[jp_post_view]