Pune : पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डासांचा राडा, हैराण करणारा व्हिडीओ समोर, नागरिक वैतागले…

Pune : महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. पुण्यातील काही भागांमध्ये सध्या डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
पुण्यातील मुळा मुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे केशवनगर खराडी भागात मच्छरांचं जाळे एवढं वाढलं की काल हवेत वादळ आल्यासारखे मच्छर घोंगावत होते. डासांचं हे वादळ पाहून पुणेकर अक्षरश: हैराण झाले. जो-तो मान वर करून हवेतलं हे वादळ फक्त पहातच होता.
Mosquitoes tornado in #kharadi.
Hope this will be taken care of soon.@aaplasurendra @Kharadicivic @aolkharadi pic.twitter.com/vNcEv3FU0F— Flt Lt Virender Singh Virdi (Retd.) (@vsvirdi) February 9, 2024
याचा थक्क करणारा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. डासांचे हे चक्रीवादळ केशवनगर खराडी भागात पहायला मिळाले आहे. या व्हिडीओमध्ये मच्छर/ डासांची एक संपूर्ण झुंडच्या झुंडच एकत्र येऊन उडताना दिसत होते. हे काही भागात कॉमन असून शकतं पण शहरी भागांत असं चित्र फारच कमी दिसते. हा व्हिडीओ व्हायरल होताच, लगेच कारवाई करून सफाई करण्यात आली. Pune
मात्र डासांच्या या वादळामुळे पुणेकर प्रचंड हैराण झाले होते. अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. एवढंच नव्हे तर लहान मुलंही डासांमुळे त्रस्त झाली होती. नदीपात्रातील पाण्यामुळे डासांची ही झुंड आली असा अंदाज व्यक्त होत आहे.