सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोमार्गाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन..
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला बसला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पुणे मेट्रोच्या भुयारी प्रकल्पाचे उद्घाटन व एसपी कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आज रविवारी (दि 29) पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरंन्सद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यानंतर भुयारी मार्ग लोकांच्या सेवेसाठी सुरू केला जाणार आहे.
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहे. याशिवाय, स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील ऑनलाईनच केली जाणार आहे. इतरही अनेक कार्यक्रम होतील, असे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी रविवारी मेट्रो स्थानका सोबतच स्वारगेट – कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील करणार आहेत. याचसोबत पंतप्रधान मोदी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील करणार आहेत. तर बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.