Pune : तडीपार असतानाही शहरात बिनधास्त फिरणाऱ्या गज्या मारणे टोळीतील दोन जणांना बेड्या..
Pune : पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यामधून २ वर्षांसाठी तडीपार केले असतानाही ते शहरात बिनधास्तपणे फिरत होते. अशा दोघा तडीपार गुंडांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली.
अभिजित ऊर्फ चौक्या तुकाराम येळवंडे (वय २६, रा. जाधव चाळ, काकडे पॅलेसशेजारी, कर्वेनगर) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. अभिजित येळवंडे हा गज्या मारणे टोळीचा सदस्य आहे.
गज्या मारणे टोळीतील सदस्यांसह १८ जणांना पुणे पोलिसांनी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या काळात एकाचवेळी तडीपार केले होते. त्यात चौक्या याचा समावेश होता. त्याला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी २८ ऑगस्ट २०२४ पासून २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दुसर्यांदा तडीपार केले होते. असे असतानाही तो तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता.
पोलीस अंमलदार प्रतिक मोरे व गणेश शिंदे हे तडीपार आरोपी चेक करीत असताना वारजे माळवाडीत तो आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या हवाली केले. Pune
खंडु ऊर्फ पॅडी मारुती म्हेत्रे (वय २२, रा. शिवकृपा अपार्टमेंट, हॅपी कॉलनी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) असे दुसर्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून ९ जून २०२४ पासून २ वर्षे तडीपार केले होते.
पोलीस हवालदार गणेश सुतार व विनोद जाधव हे तडीपार आरोपी चेक करीत असताना शिवकृपा अपार्टमेंट येथे खंडु म्हेत्रे हा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सिंहगड रोड पोलिसांच्या हवाली केले आहे.