पुण्यातील सात वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्याला अखेर जन्मठेप ; न्यायालयाचा मोठा निर्णय


पुणे : चॉकलेटच्या बहाण्याने सात वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला न्यायालयाने अखेर जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलाने निर्भयपणे दिलेली साक्ष, डीएनए चाचणीचा अहवाल, पीडित मुलाची आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीच्या आधारे विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेश विष्णू जाधव असं शिक्षा झालेल्याच नाव आहे. ही घटना 26 जुलै 2016 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उत्तमनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी मुलाच्या 28 वर्षीय आईने उत्तमनगर पोलिसात फिर्याद दिली. घटनेच्या दिवशीच आरोपीने चॉकलेटच्या बहाण्याने मुलास खोलीत बोलवले. त्यानंतर रुमालाने गळा दाबून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्याला मारहाण केली. त्यामध्ये मुलाच्या शरीरावर जखमा झाल्या.पीडित मुलगा रक्तबंबाळ होऊन घरी आल्यानंतर घटनेची माहिती आईला मिळाली. तिने मुलाला वारजे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर दहा दिवस उपचार सुरू होते. तिथे सहायक निरीक्षक विशाल इंगळे यांनी या मुलाचा व त्याच्या आईचा जबाब नोंदविला. तत्कालीन सहायक निरीक्षक कोंडीभाऊ जाधव यांनी तपास करून आरोपीला अटक केली होती.

या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगा, त्याची आई, वैद्यकीय अधिकारी, पंच, पोलिस अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलाने अत्याचाराचे धक्कादायक वर्णन केले. रुग्णालयात केलेल्या तपासणीत पीडित मुलाच्या अंगावर चावल्याच्या व दगडाने मारहाण केल्याच्या जखमा आढळल्या. पीडित मुलाच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग व आरोपीच्या रक्ताचे नमुने एकच असल्याचे डीएनए तपासणीत आढळून आले. अखेर न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!