Pune Local : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे, ‘या’ लोकल गाड्या होणार रद्द…

Pune Local : पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे-लोणावळा मार्गावर इंजीनियरिंग आणि तांत्रिक कामांकरीता रविवार (ता.१०) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एमजीआर चेन्नई -लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्र.१२१६४) मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशीराने धावणार आहे. Pune Local
पुण्याहून लोणावळ्याकडे रद्द होणाऱ्या गाड्या..
पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७, ११.१७ दुपारी ३.०० आणि सायंकाळी ४.२५, ६.०२ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. शिवाजीनगरहून तळेगाव करीता दुपारी ३.४७, ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
लोणावळ्याहून पुणेकडे रद्द होणाऱ्या गाड्या..
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी १०.०५, सायंकाळी ५.३०, ६.०८, ७.३५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी २.५०, सायंकाळी ७.०० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. तळेगाव येथून पुणेसाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.