Pune : पुण्याला लागलंय वेगळंच वळण! आता ड्रग्स पार्टी प्रकरणात 7 जण अटकेत, पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही निलंबित…

Pune : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी, तसेच इतर चुकीच्या गोष्टी वाढतच आहेत. आता एफसी रस्त्यावरील लिक्विड, लेजर, लाऊंज या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती.

यामध्ये पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. यामुळे यावर चौकशी सुरू आहे. या पार्टीत काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना इशारा दिला होता.
परंतु ड्रग्स सारख्या गंभीर विषयाकडे देखील पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू होती. यावर अनेकांनी आवाज उठवला आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर याबाबत आक्रमक झाले आहेत. आता या ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. Pune

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
दोन बीट मार्शलला या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर आणि मोहन राजू गायकवाड या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.