पुण्यात मध्यरात्री चार दुकानांना भीषण आग ; दोन जण जखमी

पुणे – सातारा रस्त्या, नातूबाग बस स्थानक समोरील, इंद्रनिल सोसायटी मधील चार दुकानांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (ता.१) मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली आहे. या आगीत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यराञी १.३० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आगीची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला देण्यात आली.
माहिती मिळताच दलाकडून कात्रज, कोंढवा आणि सिंहगड रोड अग्निशमन केंद्राच्या मिळून ०६ फायरगाड्या ०२ वॉटर टँकर व ०१ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. माजी नगरसेवक महेश वाबळे देखील उपस्थित होते, या दुर्घटनेत समीर कोलते, गंभीर जखमी झाले असून रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिक जखमी झाला आहे.
दरम्यान, कात्रजसह कोंढवा आणि सिंहगड रोड अग्निशमन केंद्राच्या मिळून आठ गाड्यांनी आग आटोक्यात आणली, तत्पूर्वी या भिषण आगीत देवयानी इलेक्ट्रॉनिक (दोन गाळे), गृहिणी किचन आणि देवयानी मोबाईल शाँपी संपूर्ण जळून खाक झाले होते. मात्र या आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.