Pune : पुणे ससूनमध्ये डॉक्टरांचा अजून एक भयंकर कारणामा उघड! अंधारात डॉक्टर करायचा असे काही…; घटनेने सगळे हादरले


Pune : ससून रुग्णालयातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससूनमधील डॉक्टर रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जनस्थळी सोडून येत होतो. डॉक्टरी पेशाला कलंक लावण्याचा लाजीरवाणा प्रकार ससून रुग्णालयात घडला आहे.

या संदर्भात एका सामाजिक संस्थेने भांडाफोड केला आहे. तसेच येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी खळबळजनक प्रकार समोर आणला आहे. ते बेवारस रुग्णांची सेवा करतात.

शहरातील रस्त्यांवर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. त्यांनी एका बेवारस रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु दुसऱ्या दिवशी तो रुग्ण गायब होता.

या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही, अशी माहिती मिळाली. यामुळे त्या रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार झाल्याची शंका दादासाहेब गायकवाड यांना आली. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे.

दादासाहेब यांनी ससूनमधील प्रकार उघडकीस आणण्यासाठी सापळा रचला. त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते.

त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असल्याचे समजून एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर या ठिकाणावरुन लांब नेऊन सोड,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, असे म्हटले.

त्यांनी त्यांना म्हटले ‘नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे विचारल्यावर डॉक्टर म्हणाले, तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो, असे डॉक्टरांनी सांगितले. Pune

दरम्यान, काही वेळाने डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, नवीन बिल्डिंगमधून दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले.

अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. त्यानंतर रितेश याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली.

त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!