Pune Hording : पुन्हा मोठी दुर्घटना! पिंपरी- चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, लोखंडी होर्डिंग कोसळले, गाड्यांचा भुगा…

Pune Hording : पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही.
रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे, की अनधिकृत हे समजू शकल नाही.
आज दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नाही. Pune Hording
दरम्यान, घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवारपासून (ता.१५) सुरुवात केली आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंगधारक मालकांनी दोन दिवसामध्ये आपले अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यास पालिकेने सांगितले आहे. याच दरम्यान मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.