Pune : धक्कादायक! क्रेनचा हूक तुटला अन् क्षणात सगळं संपलं, कामगाराचा जागीच मृत्यू, नाना पेठेमधील घटना….


Pune : महापालिकेच्या मालकीचा विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक तुटून ठेकेदाराकडील कामगाराच्या डोक्यात पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (ता.३) दुपारी घडली आहे.

पांडुरंग म्हस्के (३५, रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, म्हस्के हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. पुणे महापालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नाना पेठ येथे डोके तालीमजवळ जुना विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. हे काम ठेकेदारामार्फत सुरू होते. Pune

हे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा पुढील भाग पाठीमागे घेताना हूक तुटला. तेथे उपस्थित ठेकेदाराकडील कर्मचारी पांडुरंग म्हस्के या इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात ताे पडला. म्हस्के यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रेन जप्त केली असून, याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षय गोरड हे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!