पुणे शहरातील हडपसर परिसरात पाणी पुरवठा बंद…!


पुणे : पुण्यातील रामटेकडी ते खराडी भागातील जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याच्या कामासाठी गुरुवारी हाती घेण्यात आले आहे. यामुळे परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

यामुळे दोन दिवस नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया याठिकाणी पाणी येणार नाही.

तसेच भारत फोर्स कंपनी एरिया, महंमदवाडी, हांडेवाडी रोड, गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा सिटी, मुंढवा गाव, केशवनगर, भीमनगर, शिंदे वस्ती, शिर्के कंपनी, काळेपडळ, गाडीतळ, वैदूवाडी हडपसर, हेवन पार्क, भारत फोर्स कंपनी एरिया, याठिकाणी देखील पुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान हे काम दोन दिवस चालणार आहे. यामुळे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याठिकाणी पाणी लवकरच सुरू केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!