पुण्यामधील हडपसर उड्डाणपुल आज पासून तीन दिवस बंद राहणार…!


पुणे : पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल आजपासून तून दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १० फेब्रुवारी ते रविवार १२ फेब्रुवारीपर्यंत पुणे ते सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बाजूची उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

सोलापूर पुणे वाहतूक सुरू राहणार आहे.

लोड टेस्ट करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावर बांधण्यात आलेला हडपसर गांव ते गाडीतळ – जाणारा उड्डाणपुल धोकायदायक झाला असल्याने ५ फेब्रुवारी २०२२ पासून वाहतूकीसाठी संपूर्ण बंद करण्यात आला होता. पुलावरुन जाणारी संपुर्ण वाहतूक सर्व्हिस रोडवळून वळवण्यात आली होती. सदर पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून सदरच्या पुलावर लोड टेस्ट करणेसाठी पुलावरुन जाणारी वाहतूक बंद करण्याबाबत पुणे महानगरपालिकेला कळवण्यात आलं आहे.

हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत हडपसर उड्डाणपुलावरील पुणे ते सोलापूर व सासवडकडे जाणाऱ्या लेनवरुन जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० फेब्रुवारी १२ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे. सदर कालावधीत उड्डाणपुलावरुन सोलापूरकडून पुणेकडे व सासवडकडून पुणेकडे येणारी वाहतूक सुरु राहील. हडपसर उड्डाणपुलाच्या खालुन पुणे-सोलापूर रोड या पर्यायी मार्गाच वापर नागरिकांना करता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!