Pune Fire News : मोठी बातमी! पुण्यात ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला भीषण आग, आगीत सगळं हॉस्टेल जळून खाक..


Pune Fire News : पुण्यातील रास्ता पेठ भागात ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनी वसतिगृहात असतानाच ही आग लागल्याची माहिती आहे. आज सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पुर्ण जळाल्याची माहिती आहे. Pune Fire News

वसतिगृहाची ही इमारत एकूण ४ मजल्यांची आहे. पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच त्यांनी प्रथम मुलींना सुरक्षित बाहेर काढले. तसेच मजल्यावर आतमध्ये आणखी कोणी अडकले आहे का याची खात्री करून घेतली.

त्यानंतर जवानांनी सदर खोलीत आगीवर पाणी मारले आणि नियंत्रण मिळवले. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्णत: जळाल्यात. खोलीमध्ये असलेल्या हिटरमुळे आग लागल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!