Pune Fire : पुण्यात कात्रज भागातील झोपडयांना भीषण आग, दहा झोपड्या जळून खाक झाल्याने संसार उघड्यावर..

Pune Fire : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील झोपड्यांना मोठी आग लागली आहे. या आगीत सहा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घरातील सर्व साहित्य जळाले आहे. अग्निशमन दलाकडून ४ अग्निशमन वाहने व ३ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होते. या आगीमधे एक गॅस सिलेंडर फुटला आणि इतर सहा सिलेंडर जवानांनी तातडीने बाहेर काढले. आगीमध्ये कोणी अडकले आहे का याची खात्री केली असता कोणी नसल्याची माहिती मिळाली. Pune Fire
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजता काञज-कोंढवा रस्ता, केदारेश्वर नगर, पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या काही झोपड्यांमध्ये आग लागल्याची वर्दि मिळाली. याची तातडीने दाखल घेत अग्निशमन दलाकडून ४ अग्निशमन वाहने व ३ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी पोहोचताच येथील दहा झोपड्यांना आग लागल्याची जवानांना दिसले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग इतरञ पसरु नये याची खबरदारी घेत पाऊण तासांत ही आग आटोक्यात आणली.
घरांची तपासणी केली असता. या आगीमधे एक गॅस सिलेंडर फुटला आणि इतर सहा सिलेंडर जवानांनी तातडीने बाहेर काढले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. घरामध्ये असलेले सर्व गृहपयोगी साहित्य पूर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले.
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत एकुण १० झोपड्या आगीमध्ये पुर्ण जळाल्या. घरामध्ये असलेले सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणी जखमी नाही.