Pune : मोठी बातमी! प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, धक्कादायक माहिती आली समोर, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
Pune : प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य वाडेकर (महाराज) यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी चैतन्य महाराज आणि त्यांच्या भावांविरोधात तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी अशी आहेत. या प्रतापापायी त्यांना तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, चैतन्य महाराज यांच्या घरापासून जवळ एक कंपनी आहे. त्या कंपनीचा रस्ता पोकलेनने खोदला. या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शेजारीच असलेल्या कंपनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद आहेत.
याच वादातून त्यानी रात्री त्यांच्या दोन भावांसह रस्ता बेकायदेशीरपणे खोदला या अरोपावरून करण्यात आलेल्या तक्रारी नुसार ही अटक केली गेलीय. चैतन्य महाराज वाडेकर यांनी मात्र आपल्याला अटक झाली नसल्याचे म्हंटले आहे.
चैतन्य महाराज म्हाळुंगे परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारीच एक कंपनी असून तिथल्या वाटेवरून त्यांच्यात वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता चैतन्य महाराज यांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदल्याचा आरोप आहे. Pune
दरम्यान, याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तिघांना आधी ताब्यात घेण्यात आले होते नंतर अटकही केली.