Pune : लाचखोर अडकला! थेऊर येथे सातबारा नोंदीसाठी ३० लाखांच्या खंडणीची मागणी, लोणी काळभोरमध्ये गुन्हा दाखल..
Pune उरुळी कांचन : जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केल्यानंतर सातबारावर नोंद करून देण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करून १८ लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले. त्यानंतर सातबारा नोंद होण्यासाठी हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी मागणी करण्यात आली आहे.
ही घटना थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयाच्या समोर २७ जुलै ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली आहे. याप्रकणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. Pune
कैलास परशुराम कडू (रा. जयभवानीनगर पौड रोड), सचिन कैलास कडू (रा. शिवणे) या दोघांच्या विरुद्ध लोणीकाळभोर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बारामती येथील ३१ वर्षांच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी दिलीप कडू आणि इतरांकडून १०६ गुंठे जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केली. त्या जमिनीची सातबारावर नोंद करून देण्यासाठी दिलीप कडू यांचे नातेवाईक असलेले आरोपी कैलास कडू आणि सचिन कडू यांनी संगनमत करून पैशाची मागणी केली.
खरेदीखतातील उल्लेख केलेल्या रकमेव्यतिरिक्त फिर्यादींकडून प्रथम १८ लाख रुपयांची खंडणी स्वरूपात घेतले. त्यानंतर वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी सातबारा नोंद होण्यास हरकत घेणारा अर्ज केला होता. हा
हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी फिर्यादींना आणखी ३० लाख रुपयांची खंडणी मागून, ती न दिल्यास सातबारावर नोंद होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.