Pune News : थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर, इंद्रायणी नदीत बुडून ३० वर्षीय युवकाचा मृत्यू..
Pune News पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लावणारी घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे. नव वर्षांच्या स्वागतासाठी अनेकजण नदी काठी, धरणाकाठी फिरायला जातात.
पुण्यातील मावळ तालुक्यात धक्कादायक दुर्घटना घडली आहे. थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Pune News
मयूर भाटी (३०, रा. शिक्षक सोसायटी वराळे) मयूर भाटी असे नदीत बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मयूर हा मित्रांसोबत मावळ तालुक्यातील वराळे येथे थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी वराळे येथील इंद्रायणी नदी काठी आले होते. पोहण्यासाठी मयूर पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, यानंतर मृतदेह काढण्यासाठी वन्य जीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्यांनी काही वेळात मृतदेह बाहेर काढला आहे. नव वर्षांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयूर यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.