Pune : जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवड्यातील खुल्या कारागृहातून पळाला, खून प्रकरणात झाली होती शिक्षा…


Pune : येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (ता.१९) रोजी समोर आली आहे.

राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३,रा. महालगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या कैद्याचे नाव आहे.

राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून (प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्याला न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. Pune

दरम्यान याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह नियमानुसार सायंकाळी कारागृह बंदी गणती केली जाते. यावेळी अविनाश पवार यांना राजू दुसाने हा बंदी आढळून आला नाही.

अधिकारी व अंमलदार यांनी येरवडा खुले कारागृहात सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे खुले कारागृहातून पळून गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. सहायक पोलीस फौजदार जायभाये तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!