Pune : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल, ११ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू..

Pune : पुण्यात लोहगाव येथे क्रिकेट खेळणे एका ११ वर्षांच्या कुस्तीपटूच्या जिवावर बेतले आहे. क्रिकेट खेळतांना गुप्तांगाला बॉल लागल्याने एका ११ वर्षीय कुस्तीपटूचा मृत्यू झाला. ही घटना लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात गुरुवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली आहे.

शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शौर्य उर्फ शंभू हा सहावीमध्ये शिकतो. सध्या शौर्यच्या शाळेला सुट्या लागल्या होत्या. यामुळे तो गुरुवारी (ता.२) सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता. शौर्यला खेळताना अचानक वेगाने पुढून येणारा चेंडू त्याच्या गुप्तांगावर लागला. त्यावेळी तो मैदानच खाली कोसळला. Pune

काही वेळानंतर तो उठून उभा राहिला मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने नंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शंभू याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
