Pune Crime : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले अन् लॉजवर नेऊन केला बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटनेने उडाली खळबळ..
Pune Crime : पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कदायक घटना उघडकी आली आहे. ही घटना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये घडला आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
याप्रकणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.६) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश रमेश बिराजदार (रा. हांडेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आकाश याने फिर्यादी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये नेले. त्याठिकाणी गप्पा मारत असताना त्याने अश्लील चाळे केले.
दरम्यान, याला विरोध केला असता आरोपीने तरुणीसोबतजबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.